मुंबई | बुलंद आवाज न्यूज | ६ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या आंदोलनाबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटू) दखल घेतल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यभरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये नियमित आरोग्य सेवा पुन्हा सुरू होणार आहे.
