रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
महागाव:
तालुक्यातील पुसद मतदार संघातील शेवटच्या टोकावर वसलेल्या मौजा वाकान येथील दुधगाळ नाल्यावरील पुलाची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन या वर्षीच्या पहिल्याच पुरात हे पुल वाहुन गेले आहे त्यामुळे हा मार्ग बंद पडला असुन ये-जा करनाऱ्या नागरिकांना या मार्गावरून मोठी कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे या रस्त्याच्या मार्गाने वाकान कोदंरी येथील अनेक शेतकऱ्यांची शेती माळपटारावरील माळहिवरा शिवारात येत असल्याने व सध्या शेतीतील कामांना वेग आल्याने या एकमेव मार्गानेच शेतकरी व मजुर वर्गांना प्रवास करावा लागतो त्यामुळे या नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणे आवश्यक झाले आहे गेल्या वर्षी आगष्ट सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाल्याने या पुलाचा दर्जा खालावल्याने हे पुल जीर्ण अवस्थेत होते त्यावेळी राज्य मंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी या परिसरात नुकसानीची पाहणी करून पुल बांधकामांसाठी निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र एक वर्ष लोटूनही या नाल्यावरील पुलाची स्थिती जैसे थे त्या अवस्थे पेक्षाही बिकट असल्याने या मार्गावर तातडीने पुलाचे बांधकाम करण्याची आवश्यकता भासत आहे या करिता वि. राज्य मंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी तात्काळ लक्ष केंद्रित करून व निधी मंजूर करून येथील दुधगाळ नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याची जोरदार मागणी वाकान येथील माजी उप सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विलास मनवर यांनी केली आहे.
